services
Skip to main content

बिझनेस प्लॅनिंग आणि कल्पनेची तपासणी

  • प्रोजेक्ट रिपोर्ट / बिझनेस प्लॅन तयार करणे
  • प्रोजेक्ट रिपोर्टच्या आधारे व्यवहार्यता (Viability) तपासणी
  • प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास करणे किंवा माहिती गोळा करणे.
  • तयार झालेल्या रिपोर्ट निधी उभारणीसाठी परिपूर्ण असेलच असे नाही.
₹२,३६० मध्ये उपलब्ध
₹२,३६० मध्ये उपलब्ध
४ दिवसांत उपलब्ध
४ दिवसांत उपलब्ध
चालू प्रक्रिया
चालू प्रक्रिया

बिझनेस प्लॅनिंग आणि व्यवसाय कल्पनेच्या तपासणी संदर्भातील इतर साधने

चेकलिस्ट
पाहा
टूल्स
तज्ज्ञांचा सल्ला
पाहा
व्हिडिओ
पाहा
नमुना
पाहा
image-131
बिझनेस प्लॅनिंगमुळे कामाची दिशा स्पष्ट होते आणि भविष्यात वेळ व साधनांची बचत होते.
image-129
व्यवसायासाठी निधी उभारायचा असेल, तर बिझनेस प्लॅन ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. कारण निधी देणाऱ्या संस्था बिझनेस प्लॅनला महत्त्व देतात.
बिझनेस प्लॅनमधील अंदाजांमुळे भविष्यात तुमचा व्यवसाय कसा चालेल, हे समजण्यास मदत होते.
बिझनेस प्लॅनमुळे तुमच्या व्यवसायाच्या गृहितकांची पडताळणी करता येते आणि तुमच्या उत्पादन किंवा सेवेची बाजारातील मागणी समजण्यास मदत होते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुमच्या मनात असणाऱ्या सर्वसाधारण प्रश्नांची उत्तरे येथे दिली आहेत. तरीही तुम्हाला हवी असलेली माहिती मिळाली नाही, तर आमच्या टीमशी संपर्क साधा.
फिजिबिलिटी म्हणजेच ‘व्यवहार्यता’ - तुमची कल्पना किंवा व्यवसाय प्रत्यक्षात सुरू करता येईल का, हे तपासणे. तर व्हायबिलिटी म्हणजेच ‘प्रत्यक्षात’ - तो व्यवसाय भविष्यात टिकाऊ आणि फायदेशीर ठरू शकेल का, याचे मूल्यांकन करणे.
बिझनेस प्लॅन आणि प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केल्यामुळे व्यवसायाची योग्य दिशा ठरवता येते आणि पुढील नियोजन अधिक प्रभावीपणे करता येते. त्याचे अनेक फायदे आहेत, जसे की: - तुमच्या व्यवसायाच्या गृहितकांची पडताळणी करता येते. - तुमच्या उत्पादन किंवा सेवेची बाजारातील मागणी समजण्यास मदत होते. - तुमच्या व्यवसायासाठी स्पष्ट आराखडा तयार होतो, त्यामुळे वेळ आणि संसाधनांची बचत होते. - भविष्यात व्यवसाय कसा चालेल, याचा अंदाज घेण्यास मदत होते.
नवीन व्यवसाय सुरू करताना तुमची व्यवसाय कल्पना व्यवहार्य (फिजिबल) आणि भविष्यात टिकाऊ (व्हायबल) आहे का, हे तपासण्यासाठी बिझनेस प्लॅन तयार करणे उपयुक्त ठरते. तसेच, आधीपासून व्यवसाय सुरू असेल, तर व्यवसायाचा विस्तार करताना, नवीन उत्पादन किंवा सेवा सुरू करताना किंवा नवीन शाखा सुरू करण्यापूर्वीही बिझनेस प्लॅन तयार करणे महत्त्वाचे आहे.
आमची बिझनेस प्लॅनिंग आणि व्यवसाय कल्पनेची तपासणी सेवा तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन करते. तुमची व्यवसाय कल्पना तपासून तिची व्यवहार्यता (फिजिबिलिटी) आणि भविष्यातील टिकाऊपणा (व्हायबिलिटी) यांचे मूल्यांकन करण्यात आम्ही मदत करतो. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा नवीन उत्पादन, सेवा किंवा व्यवसाय विस्ताराचा विचार करत असाल, तर तुमच्या कल्पनेची पडताळणी करून योग्य बिझनेस प्लॅन तयार करण्यात आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. या बिझनेस प्लॅनमध्ये तुमची उद्दिष्टे, लक्ष्यित ग्राहक, आर्थिक अंदाज आणि व्यवसायाची कृती योजना यांचा समावेश असतो, ज्यामुळे तुमचा व्यवसाय भक्कम पायावर उभा राहून वाढीच्या दिशेने वाटचाल करू शकतो.

deUdyog Mitra सोबत संवाद साधा

Leave us a voice message on
+91 7501750153 / +91 9373035540