services
Skip to main content

रोख प्रवाह व्यवस्थापन

  • व्यवसायातील रोख प्रवाहाचे सखोल विश्लेषण.
  • व्यवसायातील पैशांची आवक-जावक यांची सविस्तर नोंद
  • रोख प्रवाह सुधारण्यासाठी सूचना आणि आवश्यक उपायांसह सविस्तर अहवाल
  • वित्तीय संस्थांकडून कर्जासाठी अर्ज करण्याची तयारी करण्यात सहकार्य
  • कोणतीही विशिष्ट बाब वगळलेली नाही.
₹२३६ मध्ये उपलब्ध
₹२३६ मध्ये उपलब्ध
१ दिवसात उपलब्ध
१ दिवसात उपलब्ध
व्यवसायातील रोख प्रवाह समजून घेण्यास मदत होते
व्यवसायातील रोख प्रवाह समजून घेण्यास मदत होते
बजेट नियोजनासाठी  आवश्यक
बजेट नियोजनासाठी आवश्यक

रोख प्रवाह व्यवस्थापनासंदर्भातील इतर साधने

चेकलिस्ट
पाहा
टूल्स
तज्ज्ञांचा सल्ला
पाहा
व्हिडिओ
पाहा
नमुना
पाहा
उत्पन्नाची आवक आणि खर्च यामधील तफावतीमुळे निर्माण होणारी रोख रकमेची कमतरता टाळण्यास मदत होते.
यामुळे विक्रीची उद्दिष्टे ठरवताना आवश्यक रोख रकमेचे नियोजन आणि व्यवसायावरील खर्च नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
यामुळे रोख प्रवाहाचे प्रभावी व्यवस्थापन, कर्ज परतफेडीचे नियोजन आणि भविष्यातील अंदाज बांधणे सोपे होते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुमच्या मनात असणाऱ्या सर्वसाधारण प्रश्नांची उत्तरे येथे दिली आहेत. तरीही तुम्हाला हवी असलेली माहिती मिळाली नाही, तर आमच्या टीमशी संपर्क साधा.
रोख प्रवाह म्हणजे व्यवसायात होणारी पैशांची आवक आणि जावक. याच रोख रकमेच्या आधारे व्यवसायाचे दैनंदिन खर्च भागवले जातात. यालाच ‘कॅश फ्लो’ असे देखील म्हणतात.
रोख प्रवाह व्यवस्थापन म्हणजे व्यवसायातील पैशांची आवक-जावक यावर लक्ष ठेवून त्याचे योग्य नियोजन करणे. यामुळे रोख रकमेची गरज समजते आणि भविष्यासाठी योग्य बजेट नियोजन करता येते.
रोख बजेट म्हणजे सध्याच्या रोख प्रवाहाच्या आधारे भविष्यात किती रोख रक्कम लागेल, याचे नियोजन करणे. यामुळे आवश्यक देयके वेळेवर भरता येतात आणि रोख रकमेची कमतरता टाळता येते.
रोख प्रवाह व्यवस्थापन करताना अनेक व्यवसायांकडून पुढील चुका होतात: - भविष्यात मिळणाऱ्या रोख रकमेचा जास्त अंदाज बांधणे. - अनपेक्षित खर्चासाठी पुरेशी रोख रक्कम राखून न ठेवणे. - येणी वेळेवर वसूल न करणे. - सिझननुसार रोख प्रवाहात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करणे.

deUdyog Mitraशी संवाद साधा

Leave us a voice message on
+91 7501750153 / +91 9373035540